Hingoli Saam
महाराष्ट्र

Hingoli News: महिलेनं दाखवला चोरट्यांना 'पुष्पा स्टाईल' इंगा, झाडूनं तिघांनाही झोडलं

Hingoli woman foils thieves: हिंगोलीच्या वसमत शहरातील बालाजी नगर परिसरात एका महिलेने धाडसाने चोरट्यांना खराट्याने झोडलं आहे. हे सर्व प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Bhagyashree Kamble

सोन्याचे गंठण चोरणाऱ्या चोरट्यांची महिलेने पळता भुई थोडी केली आहे. महिलेने झाडूच्या खराट्याने चोरट्यांची धुलाई करत सळो की पळो करून सोडले आहे. महिलेचा रुद्रावतार पाहून चोरट्यांना त्याच ठिकाणी घाम फुटला आहे. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. ही घटना हिंगोलीच्या वसमत शहरात घडली असून, या घटनेनंतर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पुष्पा अवचार असे महिलेचे नाव आहे. ही महिला हिंगोलीच्या वसमत शहराती लबालाजी नगर भागातील रहिवासी आहे. पुष्पा सकाळी घराबाहेर खराट्याने झाडू मारत होती. तीन चोरटे दुचाकीतून त्या ठिकणी आले. त्यांनी झाडू मारत असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रसंगावधान राखत पुष्पा यांनी हातातील खराट्याच्या झाडूचा वापर करत चोरट्याची चांगलीच धुलाई केली आहे. अचानक झालेल्या प्रतिकारामुळे चोरटे घाबरले. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पळ काढत असताना घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरम्यान वसमत शहर पोलीस ठाण्यात पुष्पा अवचार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पुष्पा अवचार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TDR File Approval : महापालिकेची मोठी घोषणा! टीडीआर प्रक्रिया आता फक्त ९० दिवसात, 'या' तारखेपासून नियम लागू होणार

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

SCROLL FOR NEXT