boyfriend hits girlfriend in parbhani Saam TV
महाराष्ट्र

Parbhani Crime News : 3 महिन्यांपूर्वी पळून जाऊन केलं लग्न, आज प्रेयसीलाच संपवलं; प्रियकराने पाेलिसांना सांगितली स्टाेरी

परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारास नेताना युवतीचा मृत्यू झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

राजेश काटकर

Parbhani News :

तीन महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केलेल्या युवकाने आपल्याच प्रेयसीवर आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास धारधार शास्त्राने वार करीत तिला संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. या घटनेनंतर युवक स्वत: पाेलिस ठाण्यात हजर झाला आहे. पाेलिस त्याची कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

परभणी पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार संबंधित युवतीवर धारधार शस्त्राने हल्ला झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्या डाेक्यावर देखील इजा झाली आहे. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर बनली हाेती. तिला परभणी जिल्हा रुग्णालयात (parbhani general hospital) उपचारास नेताना युवतीचा मृत्यू झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

या घटनेतील जखमी अल्पवयीन असल्याची माहिती युवकाकडून (youth) पाेलिसांना प्राप्त झाली आहे. आम्ही दाेघांनी तीन महिन्यांपूर्वी पळून जाऊव लग्न केल्याचेही युवकाने पाेलिसांना सांगितले. या घटनेचा अधिक तपास करीत असून युवकाची संपुर्ण चाैकशी झाल्यानंतर त्याने हा प्रकार का केला याचा उलगडा हाेईल असे पाेलिसांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

SCROLL FOR NEXT