Boyfriend Brutally Beat His Girlfriend Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News: प्रियकर की हैवान! प्रेयसीला केली लाथाबुक्क्यांनी मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल; कारणही आलं समोर

Boyfriend Brutally Beat His Girlfriend: सिल्लोड तालुक्यामध्ये येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

महादेव सावरगावे, साम ब्युरो

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथे ही घटना घडली आहे. या तरुणाने आपल्या प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाने प्रेयसीला जाब विचारत बेदम माराहाण केली.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या तरुणाने आपल्या प्रेयसीला सुरुवातील जाब विचारला. त्यानंतर त्याने तिच्या गळ्याजवळ पकडून सुरुवातीला हाताने बुक्क्या मारल्या. ऐवढ्यावर न थांबता त्याने तिच्या पोटावर लाथ देखील मारल्याचे दिसत आहे. 'लोकं बघत आहेत', असं ही तरुणी जोरजोरात ओरडत राहिली. तरी देखील तिचा प्रियकर तिला मारतच राहिला.

'मला सोड मारु नको', अशी ती विनंती करत होती तरी देखील तो ऐकत नव्हता. सर्व लोकांच्यासमोर तो तिला मारतच राहिला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या या घटनेवर संभाजीनगरमध्ये चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel room hidden camera: तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा तर लपवलेला नाही ना? छुपा कॅमेरा शोधण्यासाठी वापरा ही ट्रिक

उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, प्रमोशनचा योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

SCROLL FOR NEXT