Borivali News Saam tv
महाराष्ट्र

Borivali News : मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक

Rajesh Sonwane

संजय गडदे
बोरिवली
: गुजरातमध्ये दारू बंदी असतानाही दारूच्या तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. अशाच प्रकारे (Mumbai) मुंबईच्या बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंतरराज्यीय टोळीकडून गुजरात, भरूच येथे विविध ब्रँडची दारू पाठवली जात असल्याबाबतची माहिती (Police) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरवली एस. वी. रोड येथे सापळा रचना ४ दारू तस्करांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मद्याच्या बॉटल देखील हस्तगत केल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली एस, व्ही. रोड परिसरातील काही वाईन शॉपमधून ब्रँडेड कंपन्यांची दारू मोठ्या प्रमाणावर (Gujrat) गुजरात भरूच येथे पाठविली जाणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. यासाठी चार तरुण गुजरात येथून (Mumbai Borivali) मुंबई बोरिवली येथे येऊन ते रेल्वेने अवैधरित्या ब्रांडेड कंपन्यांची दारू घेऊन जाणार होते. मागील अनेक दिवसांपासून ही आंतरराज्य टोळी बोरिवली येथून गुजरातला दारू घेऊन जात असल्याचे समजल्याने पोलीस देखील या टोळीवर लक्ष ठेवून होते. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीची खात्री करून बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लाड, पोउनि प्रमोद निंबाळकर व एटीसी पथकाने ११ मे रोजी छापा टाकला. 

१ लाखासह चौघे ताब्यात 

या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपी गुलामभाई भवसंगबाई राज (वय ४६), साबीर शरीफ शेख (वय ३१) या दोघांना पाच दारूच्या भरलेल्या बॅगांसहित पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे आणखी दोन साथीदार बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथे उभे असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर जाऊन पिंटू विजय गुप्ता (वय २८) व दिनेश प्रेमनारायण शुक्ला (वय ५०) या दोघांना ताब्यात घेऊन यांच्याकडून आणखी सहा मद्यायाच्या बाटल्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्या. या चारही दारू तस्करांकडून विविध कंपनीच्या एकूण ६३४ दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ज्यांची बाजारभावातील किंमत सुमारे १ लाख ११ हजार ४०० इतकी आहे. पोलिसांनी या चारही जणांविरोधात विनापरवाना व बेकायदेशीररित्या दारू बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT