मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर धमकीच्या मेसेजनं एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची सुमारे १ वर्षांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या करुन आरोपीने स्वत:देखील आपलं जीवन संपवलं होतं. आता, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करत धमकी देण्यात आली आहे. 'लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद', अशा आशयाचा हा मेसेज आहे. त्यामुळे, लालचंद हे अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील साक्षीदार आहेत. त्यामुळे, तेजस्वी घोसाळकर यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. लालचंद पाल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल आणि पत्नी तेजस्वी यांना व्हॉटसअप ग्रुपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. लालचंद पाल हे ठाकरे गटाचे शिवसैनिक असून अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूवेळी ते घटनास्थळी होते. त्यामुळे, या हत्या प्रकरणात ते प्रमुख साक्षीदार आहेत. त्यातच, आता एका व्हॉट्सअप ग्रुपवर एका सदस्याने लालचंद आणि तेजस्वी यांना ठार मारण्याबाबतचा मेसेज टाकल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
मेसेजमध्ये काय लिहिलंय?
अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकून व्हॉटसअपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती 'लालचंद पाल सुधर जा, इसकी पत्नी को मत मरवा देना', असा मेसेज फोटोसोबत होता. एका व्हाट्सअप ग्रुपवर हा मेसेज होता. 'गरीब नवाज नियाज कमिटी' या व्हाट्सअप ग्रुपवर ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी २०२४ मध् गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मॉरिस नरोन्हा नावाच्या व्यक्तीनं अभिषेक घोसाळकर यांना कार्यक्रमासाठी आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. अभिषेक घोसाळकर कार्यक्रमासाठी गेले तेव्हा मॉरिसने फेसबुक लाईव्ह केलं होतं. यानंतर मॉरिसने फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हल्लेखोराने त्याचवेळी स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. पण मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडल्याचं फेसबुक लाईव्हमध्ये कैद झालं नव्हतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.