Mumbai Highcourt Manoj Jarange Patil Protest x
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! 'त्या' GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maratha Reservation Case: मराठा - कुणबी GRवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय समोर. शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार. हायकोर्टाकडून राज्य सरकारला दिलासा,

Bhagyashree Kamble

  • मराठा - कुणबी GRवर हायकोर्टाचा निर्णय.

  • शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार.

  • राज्य सरकारला दिलासा.

मराठा- कुणबी जीआरसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई हायकोर्टानं घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही धगधगत आहे. मराठा बांधव ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र, ओबीसी नेत्यांसह जनतेनं या मागणीला विरोध दर्शवला. अशातच हैदराबाद गॅझिटियर अंमलबजावणीला मान्यता देण्यास राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी सुरू झाली.

मुख्य न्यायमुर्ती चंद्रशेखर आणि न्यायमुर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडतआहे. कुणबी सेना, महाराष्ट्र माळी, समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांनी रीट याचिकांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलंय.

त्यांनी याचिकेत, २ सप्टेंबरच्या शासन आणि निर्णयास असंवैधानिक ठरवून रद्द करावे, तसेच आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. मात्र, २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Detox Drink : सकाळी उठल्यावर प्या हे हेल्दी कोथिंबीर लिंबूचे डिटॉक्स ड्रिंक

Maharashtra Live News Update: नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्याचा मुक्त संचार

Gold Price: सोन्याला चकाकी! १० तोळे सोनं १९,१०० रुपयांनी महागलं; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

आता वंदे भारतचा प्रवास होईल स्वस्त; फक्त १ ऑपशनवर क्लिक करा; ३०० रूपयांपर्यंत होईल बचत

SCROLL FOR NEXT