काय सांगता! दारू पिणाऱ्यांना डास जास्त चावतात; बेड शेअर करणाऱ्यांवर डास करतात अटॅक

Drunk People Get Bitten by Mosquitoes More: शास्त्रज्ञांनी केलेल्या अनोख्या संशोधनाची चर्चा. दारू पिणाऱ्या व्यक्तींना डास फार चावतात, अभ्यासातून माहिती समोर.
Drunk People Get Bitten by Mosquitoes More
Drunk People Get Bitten by Mosquitoes MoreSaam
Published On
Summary
  • संशोधनानुसार, दारू पिणाऱ्यांना डास फार चावतात.

  • बेड शेअर करणाऱ्यांनाही डास चावतात.

  • शास्त्रज्ञांचा अभ्यास.

नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी केलेल्या अनोख्या संशोधनाची सध्या चर्चा सुरू आहे. या संशोधनानुसार, दारू पिणाऱ्या व्यक्तींना डास सर्वाधिक चावत असल्याची माहिती समोर आली आहे. हे संशोधन एका संगीत महोत्सवात सहभागी झालेल्या सुमारे ५०० लोकांवर करण्यात आले. संशोधनादरम्यान, प्रत्येकानं आपले हात डासांनी भरलेल्या बॉक्समध्ये ठेवले. निष्कर्षानुसार, ज्यांनी दारू प्यायली होती. त्यांना सर्वाधिक डास चावले.

नेदरलँड्समध्ये लोलँड्स फेस्टिव्हल सुरू होता. यावेळी संगीताची मैफिल रंगली. तसेच डासांचे संशोधनही झाले. २०२३ साली झालेल्या या फेस्टिव्हल प्रसिद्ध कलाकारांसह निजमेगेन येथील रॅडबॉड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचाही सहभाग होता. हे संशोधक संगीतासाठी नसून, डासांचा अभ्यास करण्यासाठी आले होते.

Drunk People Get Bitten by Mosquitoes More
आदिवासी मुलींची विक्री, लग्नाचे आमिष दाखवून सौदा; ठाणे अन् पालघरमधील भयंकर प्रकार उघड

फेलिक्स होल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ५०० लोकांना या प्रयोगात सहभागी करून घेतले. प्रत्येकानं आपला हात डासांनी भरलेल्या बॉक्समध्ये ठेवला. मात्र, सुरक्षेसाठी त्यांच्या हातावर एक संरक्षणात्मक कापड लावण्यात आले. यामुळे डास वास घेऊ शकतील, पण चावू शकत नाहीत.

Drunk People Get Bitten by Mosquitoes More
दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

या संशोधनातून अनेक मनोरंजक निष्कर्ष समोर आले. प्रयोगात सहभागी झालेल्या ५०० लोकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले. प्रत्येक हातावर किती डास बसले. किती वेळ डास हातावर थांबले? याची नोंद करण्यात आली. त्यासह सहभागी लोकांची प्रतिक्रिया घेण्यात आली. तसेच त्यांच्या सवयी आणि दिनचर्याबाबत माहिती घेण्यात आली.

सहभागी लोकांनी दिवसभरात काय खाल्ले? काय प्यायले? त्यांची जीवनशैली जाणून घेण्यात आले. संपूर्ण अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला. बिअर पिणारे, गांजा आणि बेड शेअर करणाऱ्या लोकांना डास सर्वाधिक चावतात. सनस्क्रीन लावणारे, किंवा नुकतेच आंघोळ करणाऱ्या लोकांना डास कमी चावतात.

शास्त्रज्ञ फेलिक्स होल यांनी सांगितलं की, 'डासांना दारू पिणारे लोक अधिक आवडतात हे संशोधनावरून समोर आलं आहे. पण त्यामागे थेट अल्कोहोल नव्हे तर, त्यांच्या शरीराच्या तापमानातील आणि वासातील बदल कारणीभूत असतात'. ते म्हणतात, 'दारू प्यायल्यानंतर लोक अधिक उत्साही होतात. नाचू लागतात. यामुळे शरीराचे तापमान वाढते. घामाचा वास बदलतो. डास या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात', असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com