Political News Saam TV
महाराष्ट्र

Political News : महायुती सरकारला मोठा धक्का; सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

High Court of Bombay : कारखान्यांना मंजूर करण्यात आलेल्या कर्जाच्या वितरणास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे.

Ruchika Jadhav

सचिन गाड, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना शासन हमीवर सुमारे २,२६५ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी कर्ज उपलब्ध करून देण्याचा महायुती सरकारचा हा निर्णय वादात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यास मनाई केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या कारखान्यांना मंजूर करण्यात आलेल्या कर्जाच्या वितरणास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षातील अडचणीतील काही साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता.

निर्णय झाला त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहाकारी साखर कारखान्यालाही ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र लोकसभा निवडणुकीत पुणे आणि अहमदनगर मतदारसंघातून सत्ताधारी उमेदवार पराभूत झाल्यानंतर थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्याला मंजूर झालेले कर्ज रोखण्यात आले होते. मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी या बैठकीमध्ये विरोधकांच्या काही कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते.

महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राजगड सहकारी साखर कारखाना आणि रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांच्या प्रमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज झालेल्या सुनावणीत पुढील सुनावणीसाठी १९ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT