SUPREME COURT APPROVES GENDER-NEUTRAL LEGAL LANGUAGE GUIDELINES FOR COURTS AND POLICE Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra : धर्म बदलल्याने जात बदलत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court : धर्म बदलल्याने किंवा दुसऱ्या धर्माचे पालन केल्याने जन्माने प्राप्त झालेली जात बदलत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

Alisha Khedekar

  • धर्म बदलल्याने जात बदलत नाही

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला

  • न्यायालयाने समितीचा आदेश रद्द करत जन्मजात जात धर्मामुळे बदलत नसल्याचे स्पष्ट केले

  • न्यायालयाने चार आठवड्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश

"धर्म बदलल्याने जात बदलत नाही" याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ एखाद्या व्यक्तीने विशिष्ट धर्म स्वीकारला किंवा त्याचे पालन केले म्हणून जन्माने प्राप्त झालेली जात बदलत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे जातवैधता प्रमाणपत्राशी संबंधित अनेक प्रकरणांसाठीहा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.

अमरावती येथील प्राची सुधीर नेटके (वय २०) या अभियांत्रिकी विद्यार्थिनीने ‘वाणी’ या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, तिच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात ‘सैतवाल जैन’ अशी नोंद असल्याचे कारण देत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तिचा दावा फेटाळला होता. तसेच ‘जैन वाणी’चा राज्याच्या ओबीसी यादीत समावेश नसल्याचेही समितीने नमूद केले होते.

यासाठी प्राची नेटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करत समितीचा आदेश रद्द केला. न्यायालयाने म्हटले की, शाळेच्या दाखल्यातील धर्मासंबंधी उल्लेखाला खूप महत्त्व देण्यात आले आणि पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

दक्षता पथकाच्या अहवालातही प्राची नेटके यांचे कुटुंब ‘वाणी’ समाजातील असल्याचे स्पष्ट झाले होते. कुटुंब जैन धर्माचे पालन करत असले तरी त्यामुळे त्यांची जन्मजात असलेली जात बदलत नाही, असे न्यायालयाने अधोरेखित केले. यानंतर न्यायालयाने संबंधित समितीला चार आठवड्यांच्या आत प्राची नेटके यांना ‘वाणी’ समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : "...आई मला मारू नकोस" गळा दाबला, बादलीत बुडवलं; निर्दयी महिलेने पोटच्या १० महिन्यांच्या मुलीची केली हत्या

Maharashtra News Live Update: कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळून अपघात; प्रशासनाकडून तातडीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

Patra Recipe : पावसाळ्यात भजी-समोसा विसरा! नाश्त्याला बनवा चटपटीत 'पात्रा', एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Hair loss: केस गळतीने हैराण? दररोज खा ६ पदार्थ खा, काही दिवसांतच दिसेल फरक!

Beed : बीड हादरले! परळीत आढळला माणसाचा तुटलेला पाय; परिसरात प्रचंड खळबळ

SCROLL FOR NEXT