बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया
बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया : एका बोगस डॉक्टरने फक्त दहा हजार रूपयात एका तरूणीची डोक्याची शस्त्रक्रिया  केल्याने तरूणीचा मृत्यू  झाल्याचा खळबळजनक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे घडला आहे. Bogus doctor's brain surgery on a tribal girl

या प्रकारामुळे गोंदिया Gondia जिल्ह्यात सुरू असलेला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट समोर आला आहे. तरी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारही कारवाई करण्यात येत नसल्याने मृतक तरूणीच्या कुटुंबियांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मृतक तरूणीचे दमयंती सुरजलाल धुर्वे असे नाव असून समीर राँय असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.

हे देखील पहा-

साखरीटोला  येथे डॉक्टर समीर रॉय हे डॉक्टरीचा व्यवसाय करत होते. देवरी तालुक्यातील मुरदोली येथील दमयंती सुरजलाल धुर्वे या तरुणीच्या डोक्यावर मागील भागात गाठ होती. त्या गाठीवर डॉक्टर राँय यांनी कोणतीही परवानगी किंवा शस्त्रक्रियाचे कोणतेही ज्ञान नसतांना 10 हजार रुपये घेवून शस्त्रक्रिया केली.

दुसऱ्या दिवशी तरूणीला उलट्या सुरू झाल्या पण गॅसेसची समस्या असेल असे सांगून टाळले गेले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर गोंदियातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तक्रारीवरून बोगस डाँक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naresh Mhaske News | नवी मुंबईपाठोपाठ मिरारोडमध्येही म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी

Viral Video: युट्यूबरची भेटवस्तू पाहून गरीब मुलीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Nanded Water Cut: नांदेडकरांनाे पाणी जपून वापरा! चार दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

SCROLL FOR NEXT