बोगस बायोडिझेलचे पंप संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाणा: बोगस बायोडिझेलचे पंप चालताय अवैध विज कनेक्शनवर! कारवाई होणार ?

अवैध विज कनेक्शन जोडणी करणाऱ्या बोगस बायोडिझेल पंप धारकावर कारवाई होणार का? याकडे लक्ष

संजय जाधव, साम टीव्ही

संजय जाधव

बुलढाणा: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नायगाव फाट्यानजीक चक्क विज चोरी करून अवैधरित्या इंडस्ट्रियल ऑइलचा पंप चालवित असल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Bogus Biodiesel Pumps In Buldhana)

मुंबई - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नायगाव फाट्याजवळ एका हाॅटेलवर मलकापुर येथील मोहम्मद साबीर नामक इसमाने आपले भेसळयुक्त इंडस्ट्रियल ऑइलचे पंप सुरू केले आहे. तर पंपासाठी लागणारी विज ही चक्क विजेच्या खांबावरून आकडे टाकून चोरट्या मार्गाने घेतल्याचे समोर आले असुन सदर विचारणा केली असता साहेबांनीच ही विज चोरी करण्याचे सांगितल्याचे पंपधारकाने म्हटले आहे.

मात्र, चोरीच्या मार्गाने विज वापरने हा गुन्हा आहे, हे माहीती असतांना देखील हा पंपधारक या ठिकाणी बिनधास्तपणे वीज चोरी करून बायोडिझेल पंप (Biodiesel Pump) चालवीत आहेत याकडे वीज वितरण कंपनी चे अधिकारी पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या साहेबांच्या आशीर्वादाने ही वाजेची चोरी सुरु आहे? तो अधिकारी नेमका कोण हे शोधणे ही गरजेचे झाले आहे. (Buldhana News In Marathi)

हे देखील पहा-

तर याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्याने कारवाई करण्या ऐवजी साहेब पाहतील..मी एकटा काहीच करू शकत नाही, साहेबांना सांगतो. अशा प्रकारच्या उडवा उडविची उत्तरे दिली. तर या प्रकरणात आता संबंधित अधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT