Buldhana News Saam Tv News
महाराष्ट्र

Buldhana News: टक्कल व्हायरसनंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट? चिमुकल्यांना होतो त्रास; नेमका आजार काय?

Blue Baby Syndrome: शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर, दूषित पाण्यामुळे संपूर्ण जिल्हा ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत आला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला होता. मात्र, आता नवा आजार डोकं वर काढण्याच्या तयारीत आहे. ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं आजाराचे नाव असून, या आजारामुळे बालकाच्या शरीरातील कार्यक्षमता कमी होते. ज्यामुळे त्याचा जास्त धोका लहानग्यांना होत असल्याची माहिती आहे. आधीच देशावर एचएमपीवी व्हायरसचं सावट असताना, आता बुलढाण्यात ब्ल्यू बेबी सिंड्रोमने शिरकाव केल्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचं आणि बालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर, दूषित पाण्यामुळे संपूर्ण जिल्हा ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. बुलढण्यातील काही तालुके हे खारपान पट्ट्यात येतात. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात, जिल्ह्यातील भूजलात विषारी पदार्थ असल्याची घोषणा करण्यात आली होती. याकडे आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे.

त्यामुळे किडनीग्रस्त रुग्णांची संख्या देखील वाढत चाललीय. आता यासह हळूहळू विविध प्रकारचे आजार डोके वर काढत आहेत. चार दिवसांपूर्वीच शेगाव तालुक्यातील अनेक गावातील लोकांचे केस अधिक प्रमाणात गळत होते. काहींचे टक्कल देखील पडले होते. त्यानंतर या गावातील पाण्याची तपासणी केली असता, पाण्यात नायट्रेटचं प्रमाण पाचपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

अनेक ठिकाणच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी केली असता, यात नायट्रेटसह इतर विषारी घटकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. टक्कल व्हायरसनंतर आता गावातील लहान मुलं ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा आजारामुळे मुलांच्या शरीरातील कार्यक्षमता कमी होते.

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. भागवत भुसारी सांगतात, 'जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दूषित पाणी आहे. याबाबत आम्ही जनतेला आवाहनही केलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागाचे सॅम्पल आम्ही वरिष्ठ लॅबोरेटरी नाशिक व अहमदाबाद येथे पाठवले आहेत. मात्र मानवाच्या शरीरात नायट्रेटचे प्रमाण आढळत नसल्याने सध्या तरी आम्ही अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. मात्र शरीरात नायट्रेटचं प्रमाण आढळल्यास ब्लू बेबी सिंड्रोम होतो असं म्हणता येणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT