Blood Test for Depression Saam Tv
महाराष्ट्र

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

Rohini Gudaghe

संदीप चव्हाण, ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

जगभरात मानसिक आजार ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. अनेकदा आजाराचं निदान उशिरा झाल्यामुळे बऱ्याच जणांना जीव देखील गमवावा लागलेला आहे. अनेक आजारांचं निदान ब्लड टेस्टने होतं. आता मानसिक आजार देखील ब्लड टेस्टने ओळखता येणार आहेत, असं तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं कुठे आहे? खरंच ब्लड टेस्टमुळे मानसिक आजाराचं निदान होतं का ? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

अलीकडेच मानसिक आजार ब्लड टेस्टने ओळखणं सोप्प होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. अनेकजणांना मानसिक आजार असतात. मात्र, अनेकदा ते कळत (Blood Test for Depression) नाहीत. त्यामुळे त्रास वाढून अनेकदा मृत्यूदेखील झाल्याचं समोर आलंय. आता हे तंत्रज्ञान अवगत झाल्यामुळे हजारो लोकांना जीवदान मिळू शकतं. त्यामुळे हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं, त्याचा काय फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्लड टेस्टने आजाराचं निदान होणार ?

मानसिक आजाराचं निदान ब्लड टेस्टने होणार आहे. ब्लड टेस्ट करून आजाराचं निदान करता येणार आहे. बायपोलर डिसऑर्डर हा आजार साध्या रक्त चाचणीने शोधता येतो. ही वैद्यकीय चाचणी केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी शोधून (Test for Depression) काढलीय. परंतु, अजून हे तंत्रज्ञान येण्यास थोडा वेळ लागू शकतो, काही दिवसांतच हे तंत्रज्ञान विकसित होऊ शकतं. त्यामुळे हजारो लोकांना यामुळे दिलासा मिळू शकतो.

मानसिक आजार का ठरतोय जीवघेणा?

मानसिक आजाराने जगभरात 8 कोटींहून अधिक लोक त्रस्त (Blood Test) आहेत. त्यापैकी सुमारे 40 टक्के लोकांना हा आजार नैराश्यात नेतो. दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच दिसतात. त्यामुळे हे तंत्रज्ञान लवकर उपलब्ध झालं तर त्यावरून झटपट निदान करता येईल, अशी माहिती न्यूरोसायट्रिस्ट डॉ. रश्मीन अचलिया यांनी दिलीय. त्यामुळे ब्लड टेस्टने मानसिक आजार (Depression) ओळखता येणार, हा दावा खरा असल्याचं निष्पन्न होतंय. या तंत्रज्ञानामुळे आजाराचे निदान आता झटपट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मराठा समन्वयकांमध्ये गोंधळ; शरद पवार गटाच्या महिला नेत्याने पक्षाची भूमिका जाहीर केल्याने तणाव

Dharashiv-Beed News : मराठा समाजाची धारशिव आणि बीड बंदची हाक

Bigg Boss Marahi 5: अरबाज घरातून गेल्यानंतर दुसरा साथीदार पाहिजे का? पत्रकारांचा प्रश्न ऐकून निक्कीचं पडलं तोंड

Amazon Prime वर 5 धमाकेदार वेबसीरिजचा जलवा, वीकेंडला तुम्ही सुद्धा नक्की पाहा...

Chronic myeloid leukemia : रक्ताच्या या कॅन्सरबाबत तुम्हाला माहितीये का? असे ३ प्रश्न जे रूग्णाने डॉक्टरला विचारलेच पाहिजेत!

SCROLL FOR NEXT