Black scorpio Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: देशमुख हत्येमागचे काळे'कार'नामे, काळ्या स्कॉर्पिओत 19 पुरावे, पुरावे आवळणार कराडभोवती फास?

Black Scorpio: सरपंच देशमुखांच्या अपहरण ते हत्या प्रकरणात वापरलेली काळी स्कॉर्पिओ मारेकऱ्यांच्या गळ्यातील फास बनणार आहे.. त्याची कारणं नेमकी काय आहेत? स्कॉर्पिओत नेमके किती पुरावे मिळाले आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.....

Bharat Mohalkar

सरपंच संतोष देशमुखांची क्रुरपणे केलेल्या हत्येचा पट उलगडणारा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय.. अपहरण ते हत्या या घटनेसाठी वापरलेली काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय... यामध्ये देशमुखांच्या हत्येसह कराड गँगच्या काळ्या कारनाम्यांचे एक दोन नव्हे तर तब्बल 19 पुरावे समोर आलेत...या पुराव्यातून काय समोर आलंय? पाहूयात...

काळ्या स्कॉर्पिओत 19 पुरावे

काळ्या रंगाची स्कॉर्पिओ

गाडी क्रमांक - MH 44 Z 9333

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओतून सर्वाधिक 19 पुरावे मिळाले

स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर 2 ठसे

जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे आरोपी सुधीर ज्ञानोबा सांगळेचे

स्कॉर्पिओ गाडी आरोपी गॅंगचा म्होरक्या सुदर्शन घुलेची

9 डिसेंबर 2024 ला सरपंच देशमुखांचं अपहरण करुन अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली.. या हत्येप्रकरणी सीआयडीने 15 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.. त्यात या राक्षसी कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ जोडण्यात आलेत.. तर याच फोटोत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ प्रकरणाचा पट उलगडण्यासाठी महत्वाची ठरली...आरोपींचे 3 मोबाईल फोनसह, आरसी बूक, घुलेचे एटीएम कार्ड याच स्कॉर्पिओमध्ये आढळून आलेत.. त्यामुळे या काळ्या स्कॉर्पिओमधून फक्त संतोष देशमुखांचीच हत्या केली की आणखीही काळे कारनामे केले? त्याचा सखोल तपास होण्याची गरज आहे.. तर या पुराव्यामुळे वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळला जाणार का? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT