Black Panther 
महाराष्ट्र

Black Panther: कोकणात ब्लॅक पँथर; गुहागरमध्ये ब्लॅक पँथरचा वावर

Black Panther: राज्यात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढलाय. अगदी मुंबई, नाशिक सारख्या शहरातही बिबट्या वारंवार आढळतात. मात्र हा झाला सर्वसामान्य बिबट्या.पण काळा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर तुम्ही कधी पाहिलाय का? चला तर मग पाहूया राज्यात कुठे दिसला हा ब्लॅक पँथर

Girish Nikam

राज्यातील अनेक शहरांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार नेहमीचच झालंय. नागरी वस्तीत कुठे हल्ले तर कुठे चक्क घरात घुसणा-या बिबट्याची सर्वांनाच दहशत आहे. मात्र ही गोष्ट झाली सगळ्यांनाच माहित असणा-या बिबट्याची. मात्र कोकणात एक वेगळा, दुर्मिळ असलेला ब्लॅक पँथर दिसून आलाय. गुहागरच्या पिंपळ परिसरातून काही नागरिक जात होते. त्यावेळी त्यांना या ब्लॅक पँथरचं दर्शन झालं. निट पाहा रस्ता ओलांडणारा. तीक्ष्ण नजरेनं पाहणारा हा काळाभिन्न ब्लॅक पँथर आहे.

या ब्लॅक पँथरला पाहून काहींना तर प्रसिद्ध जंगल बुकच्या कथेतील मोगलीचा मित्र असलेल्या बगिराची आठवण झालीय. ब्लॅक पँथर हा तसा दुर्मिळ प्राणी आहे. तो असा सहजरीत्या कुठे दिसून येत नाही. मात्र साम टीव्हीवर तुम्ही हा दुर्मिळ ब्लॅक पँथर पाहू शकता.

ब्लॅक पँथरची वैशिष्टय पाहूया

ब्लॅक पँथर हा तसा लाजाळू आणि निशाचर प्राणी आहे. त्याच्या त्वचेवर काळा फर कोट असतो. ब्लॅक पँथरची लांबी 5 ते साडे पाच फूट असते. शेपटी 3 ते 4 फुटांपर्यंत असते. उंची दीड ते अडीच फूट असते. नर हा मादीपेक्षा 30 टक्क्यांनी मोठा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर ब्लॅक पँथरचे सरासरी वजन 30 ते 90 किलो असतं. ब्लॅक पँथर म्हशी, गायी, हरीण, ससा, उंदीर, पक्षी यांची शिकार करतो

हा ब्लॅक पँथर कोकणात फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र काही अभ्यासकांनी हा ब्लॅक पँथर कोकणातला नसल्याची शक्यता व्यक्त केलीय. दक्षिण भारतातील घनदाट जंगलात ब्लॅक पँथरचा वावर आढळतो. वाघाच्या प्रजातीमधील ही महत्वाची जात आहे. जर हा ब्लॅक पँथर कोकणात आढळला असेत तर त्याचा अधिक अभ्यास होणेही गरजेचे आहे. वनविभागानेही जनजागृती करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी? जाणून घ्या एका क्लिकवर

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT