Black magic symbols and threat note found at the farm of Niphad Deputy Mayor Anil Kunde, triggering police investigation. Saam Tv
महाराष्ट्र

काळ्या बाहुल्या, टोचलेली लिंबं, नारळावर शेंदूर अन् बांगड्या; शिंदे गटाच्या नेत्याला मारण्यासाठी काळी जादू, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय?

Black Magic Threat To Deputy Mayor In Niphad: निफाडमध्ये काळ्या जादूच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांना जीवे मारण्याची धमकी. राजकीय वैरातून सुपारी दिल्याचा आरोप

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये धक्कादायक आणि भीतीदायक प्रकार उघडकीस आला आहे. निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांना राजकीय वैरातून थेट जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, काळ्या जादूच्या माध्यमातून त्यांना धमकावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आणि निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तींनी काळ्या जादूचे प्रकार केल्याचे उघड झाले आहे. शेतामध्ये काळ्या बाहुल्या, टाचण्या टोचलेली लिंबे, नारळावर शेंदूर, हिरव्या बांगड्या टाकण्यात आल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,तुम्हाला ठार मारण्याची सुपारी मला दिलीय असा थेट इशारा देणारी धमकीची चिठ्ठी शेतात आढळून आली आहे.

हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा आहे की भविष्यातील एखाद्या गंभीर गुन्ह्याची पूर्वतयारी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकीय विरोधकांनी दबाव टाकण्यासाठी हा भीतीदायक डाव रचला आहे का, याचीही चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धमकीच्या चिठ्ठ्या फॉरेन्सिक तपासणीसाठी तसेच हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

१३ वर्षांपूर्वी लागू झालेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नेमका कुठे आहे, असा सवाल उपस्थित केला जात असून, काळी जादू आणि टोण्यांच्या माध्यमातून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलीस नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून राज्यात जोरदार राडा झाला. विशेषतः शिस्तबद्ध असणाऱ्या भाजपमध्ये तर बी फॉर्म पळवणे, फार्म हाऊसचे गेट तोडणे तर आमदारांना अश्रु अनावर होणे अशा नाट्यमय घटना राज्यानी बघितला. पराभव झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या घरात जाऊन तोडफोड करणे असे ही प्रकार घडले. आता तर थेट काळी जादू करून उमेदरवाराला जीवे ठार मारण्याचा प्रकार निफाडमध्ये घडल्याने खरंच हा महाराष्ट्र सुसंस्कृत आणि पुरोगामी राहिला आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सूख-समृद्धी येण्याचा योग; 'या' तीन राशींची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Car-Truck Accident: SUV कार आणि ट्रकचा भीषण अपघात; धडकेत कारचा चक्काचूर,६ जणांचा जागीच मृत्यू

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात खळबळ, अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

Congress: काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ७५ नेत्यांनी सोडली 'पंजा'ची साथ, राजकारणात खळबळ

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; स्वर्ग पांढऱ्या चादरीखाली, पर्यटनाला बहर

SCROLL FOR NEXT