या व्हिडिओतील नाग पाहिल्यानंतर यमुना नदीत जाण्याची कुणाची हिंमतही होणार नाही...भलेमोठे 6 ते 7 नाग या नदीत फिरताना दिसतायत...हा व्हिडिओ यमुना नदीचा असल्याचा दावा करण्यात आलाय...बोटीत बसलेले काही लोक घाबरलेलेही दिसतायत...तर काहीजण बिनधास्त बसलेयत...पण, एवढे भलेमोठे नाग बाजूला असतानाही यांना भीती का वाटत नाहीये...? असा सवाल उपस्थित केले जातायत...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...
व्हिडिओमध्ये नदीच्या मध्यभागी विशालकाय नाग दिसतायत...सोशल मीडियावर devil_heart.47 नावाच्या युजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केलाय...यमुना नदीत दिसलेल्या या नागांचा व्हिडिओ स्थानिक लोकांनी बनवल्याचा दावा केलाय...त्यामुळे एकच दहशत पसरलीय...एवढा महाकाय नाग दिसल्याने स्थानिकांमध्ये दहशत आहे...एवढा मोठा नाग खरंच यमुना नदीत दिसलाय का...?
नाग या तरुणांच्या बाजूला असतानाही त्यांच्यावर हल्ला का केला नाही...? असे सवाल उपस्थित झाल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...याची माहिती आम्ही मिळवली असता असा कोणताही नाग दिसला नसल्याचं स्पष्ट झालं...तसंच आम्ही हा व्हिडिओ कुठला आहे याचीही पडताळणी केली...त्यावेळी युर्जसच्या अकाऊंटवरील सर्व व्हिडिओची आम्ही माहिती मिळवली, मग काय सत्य समोर आलं पाहुयात...
कालिया नाग यमुना नदीत दिसलेले नाहीत
कालिया नागांचा व्हिडिओ एआय निर्मित
बोटीतील तरुणांच्या बाजूला नाग दाखवले
AI निर्मित व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल
असे भयानक व्हिडिओ टाकून व्हिव्ज वाढवण्यासाठी लोकांची दिशाभूल केली जातेय...त्यामुळे असे कुणीही व्हिडिओ टाकले तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका...कारण, आता एआयच्या माध्यमातून असे व्हिडिओ व्हायरल करून दहशत माजवली जातेय...त्यामुळे आमच्या पडताळणीत यमुना नदीत कालिया नाग दिसल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.