Maharashtra news Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

Sangli Shocking : सांगलीत निवडणुकांच्या धामधुमीत चक्क आमदार जयंत पाटलांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय.

Vishal Gangurde , विजय पाटील

निवडणुकीच्या रणधुळीला सुरुवात

निवडणुकीदरम्यान सांगलीत धक्कादायक घटना उघडकीस

जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुळीला सुरुवात झाली आहे. मागील महापालिका निवडणुकत जादूटोण्याचा प्रकार समोर आले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीत आमदार जयंत पाटलांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचे वडील दिवंगत राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिवंगत राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर काळा रंग फासून टाचण्या टोचण्यात आल्या आहेत. त्यावर लिंबू,केळी,असा उतारा करून रस्त्याच्याकडेला राजारामबापू यांचा फोटो टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे वाळवा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना राजाराम बापू पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता या नव्या प्रकारामुळे नवा वाद होण्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत.

जयंत पाटील काय कारवाई करणार?

जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार केल्याने सांगतीलील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुरोगामी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतच ही घटना उघड झालीये. या प्रकारानंतर आमदार जयंत पाटील काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुतोंडी कृती, एमआयएमसोबत युती? भाजपचा एमआयएमसोबत घरोबा?

Municipal Corporations: राज्यातील १५ महापालिकांमध्ये महिलाराज, कोणत्या महापालिकांमध्ये असतील महिला महापौर?

ठाकरेंची युती धोक्यात? मनसे शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे भाजपसोबत?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT