धुळ्यात ओबीसी उमेदवार देऊन राज्य सरकारची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात ओबीसी उमेदवार देऊन राज्य सरकारची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न !

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असताना धुळे महानगरपालिकेचा उपमहापौरपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीदरम्यान भाजपतर्फे ओबीसी उमेदवार देऊन राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: ओबीसी OBC आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असताना धुळे महानगरपालिकेचा उपमहापौरपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीदरम्यान भाजपतर्फे BJP ओबीसी उमेदवार देऊन राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. BJP's attempt to embarrass the state government by fielding OBC candidates in Dhule

ओबीसींचा आरक्षण न्यायालयातर्फे रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली यावरून राज्य सरकार State Government व केंद्र सरकार Central Government मध्ये झोपल्याचे देखील बघायला मिळत आहे. राज्यांमध्ये महा विकास आघडी सरकारतर्फे ओबीसीचे आरक्षण रद्द होण्यामागे भाजपा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे मात्र भाजपतर्फे ओबीसी आरक्षण रद्द होण्यामागे राज्य सरकार जिम्मेदार असल्याचे आरोप भाजपतर्फे लावण्यात येत आहे.

हे देखील पहा-

अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर Deputy Mayor पदासाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यादरम्यान धुळे महानगरपालिकेवर संख्या बलाबल जास्त असणाऱ्या भाजपतर्फे ओबीसी उमेदवारास उमेदवारी देण्यात आल्यानंतर भाजपतर्फे राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर निवडणुकीदरम्यान दिसून आले आहे.

ओबीसी उमेदवार भगवान गवळी Bhagvan Gavali यांना उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ओबीसी उमेदवार भगवान गवळी यांची उपमहापौर पदी वर्णी लागणं जवळपास निश्चित मानला जात होता. आज अखेर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपा तर्फे देण्यात आलेल्या ओबीसी उमेदवाराचा म्हणजेच भगवान गवळी यांचा विजय झाला आहे. या निवड प्रक्रिया दरम्यान भाजपने ओबीसी उमेदवार देऊन राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली असल्याचे दिसून येत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT