लातूर जिल्हा रुग्णालयासाठी 120 कोटी मंजूर !

बहुचर्चित लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी राज्य सरकारने 120 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
लातूर जिल्हा रुग्णालयासाठी 120 कोटी मंजूर !
लातूर जिल्हा रुग्णालयासाठी 120 कोटी मंजूर !दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : बहुचर्चित लातूर Latur जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी राज्य सरकारने State Government120 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा रुग्णालय District Hospital उभारणीस लवकरच सुरुवात होईल. त्याबरोबरच कार्डियाक कॅथलॅब Cardiac Cath Lab साठी बारा कोटी रुपये मंजूर केले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ लक्ष्मण देशमुख यांनी दिली आहे. 120 crore sanctioned for Latur District Hospital

लातूर शहरातल्या नांदेड रोड वरील कृषी विद्यालयात शेजारी जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. कृषी महाविद्यालयाकडून Agri Collage जिल्हा रुग्णालयसाठी जागा खरेदी केली आहे. सद्यस्थितीत covid-19 या संसर्गजन्य साथीच्या उपचारासाठी आवश्यक बदल व अत्यावश्यक आधुनिक सुविधा करता निधीची आवश्यकता असल्याने विकास बँकेकडून कर्ज घेतले आहे.

हे देखील पहा-

रुग्णालय बांधकाम यंत्रसामग्री उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता राज्य शासनाकडून Government मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यात आले आहे. असे शासन निर्देश निर्णयात नमूद केले आहे. एवढे दिवस लातूर जिल्ह्यासाठी जिल्हा रुग्णालय नव्हते जिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून अनेक दिवसांची मागणी होती. आणखीन विलंब लागला तरी देखील आरोग्य विभागाच्या अनुषंगाने सरकारने निधी उपलब्ध करून जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासंबंधी शिक्कामोर्तब केले. 120 crore sanctioned for Latur District Hospital

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी 120 कोटी मंजूर !
धुळे महानगरपालिकेत उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी विराजमान

जिल्हा रुग्णालय बरोबरच कार्डियाक कॅथलॅब उभारणीसाठी देखील 12 कोटी रुपये मंजूर केले. निधी मंजुरी मिळाल्याने रुग्णालय बांधकामाच्या हालचाली वाढणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मिळणाऱ्या निर्देशानुसार पुढील कारवाईस प्रारंभ होईल मंजूर झालेले 120 कोटी रुपये कशावर खर्च करायचे हे सरकारच्या सूचनांनुसार निश्चित केले जाणार आहेत. लवकरच बांधकाम व यंत्रसामग्री उपकरणे खरेदी बाबत मार्गदर्शन केले जाईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख यांनी स्पष्ट केले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com