भूषण अहिरे
धुळे : धुळे महानगरपालिकेच्या Dhule Municipal Corporation उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. धुळे महानगरपालिकेवर नगरसेवकांच्या संख्येच्या बळावर भाजपकडे धुळे महानगर पालिकेची सत्ता होती. आज देखील उपमहापौर पदी भाजपचे BJP उमेदवार भगवान गवळी Bhagvan Gavali विजयी घोषित झाले असल्याने, धुळे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा उपमहापौरपदी भाजपचा उमेदवार बसल्याने पुन्हा एकदा धुळे महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. BJP's Candidate wins as Deputy Mayor in Dhule Municipal Corporation
भगवान गवळी (भाजप) -50
खान सदीम हुसेन रहमतुल्लाह (काँग्रेस व राष्ट्रवादी)-19
शेख मेहरुन्निसा जाकीर (एमआयएम)-4
अशा पद्धतीने मतदान जाहीर झाले आहे.
हे देखील पहा-
धुळे महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार Chanfrkant Sonar आणि उपमहापौर कल्याणी अंपळकर Kalyani Anpalkar यांच्या अडीज वर्षांचा कार्यकाळ 30 जूनला संपुष्टात येत आहे. यामुळे महापौरपदाच्या आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यावर 12 जुलैला कामकाज होणार आहे. त्यामुळे महापौरपद अंतिम निकाल लागेपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता असेल. मात्र, उपमहापौरपदाची निवडप्रक्रिया आज कोरोनाच्या Corona सावटाखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळेस भाजपचे उमेदवार भगवान गवळी यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे.
यामध्ये एकूण 74 पैकी भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी 14, एम आय एम 2, समाजवादी पार्टी 2, बसपा 1, अपक्ष 2, लोकसंग्राम 1 नगरसेवक आहेत. लोकसंग्रामच्या एकमेव नगरसेविका हेमा गोटे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. BJP's Candidate wins as Deputy Mayor in Dhule Municipal Corporation
संख्याबळ बघता व भाजपने एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळे भाजपतर्फे उपमहापौरपदी भगवान गवळी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. आज उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे भगवान गवळी यांची निवड झाल्याने यावरदेखील शिक्कामोर्तब झाला आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.