राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन; पालकांचा पवित्रा

सीबीएसई मंडळ संलग्नित अभ्यासक्रम साठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सक्ती केली जात आहे, याविरोधात पालकांनी आवाज उठविला. पालकांनीच मुलांची शाळा चालवत अनोखे आंदोलन करायला सुरुवात केली आहे.
राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन; पालकांचा पवित्रा
राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन; पालकांचा पवित्राप्रदीप भणगे
Published On

प्रदीप भणगे

डोंबिवली : खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्य शिक्षण मंडळाचा State Board of Education अभ्यासक्रम बंद करुन सीबीएसई CBSE मंडळ संलग्नित अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सक्ती केली जात आहे. याविरोधात पालकांनी आवाज उठविला असून आता कल्याणच्या रिव्हर्डवूड पार्कच्या गेटसमोर पालक मुलांची शाळा चालवत अनोखे आंदोलन करायला सुरुवात केली आहे. Agitation of parents until the State Board of Education starts the curriculum

सीताबाई के. शहा मेमोरिअल शाळेला 7 वी पर्यंत राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम बंद करून आता सीबीएसई मंडळाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रवेश घेण्याची पालकांना सक्ती केली जात आहे.

हे देखील पहा-

शिक्षण मंडळाची मान्यता नसतानाही हे बोर्ड बदलून तसेच 8 वी ते 10 वी ची मान्यता नसतानाही हे वर्ग सुरु करुन शाळेने विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक केली आहे. शाळा सुरू ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिले आहेत. तरीही शाळा बंद करण्याचा घाट शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने केला आहे. Agitation of parents until the State Board of Education starts the curriculum

आता या विरोधात खिडकाळी गावचें ग्रामस्थ आणि पालक संघटना चांगलेच आक्रमक झाले आहेत. या बाबत त्यांनी बैठक घेत एक मताने शाळे विरोधात लढा देण्याचे ठरवले आहे.आम्हाला सी.बी.एस.सी.अभ्याक्रम नको असून आम्हाला राज्य मंडळ संलग्न अभ्यासक्रम हवा आहे. शाळा त्वरित सुरू करा अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन; पालकांचा पवित्रा
गोंदियात तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त

शाळा सुरू केली नाही म्हणून त्यांनी खिडकाळी गावातील रिव्हरव्ह्यूड पार्कच्या गेटवर मुलांची शाळा चालवत अनोखे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पालकवर्ग, अँड. रामदास वायंगडे, काँमेड काळू कोमास्कर, नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेवक हिरा पाटील, दिपेश पाटील, उत्तम पवार ,राम म्हात्रे, संजय पाटील, सत्यवान पाटिल, रुपेश पाटील, नवनाथ पाटील, अवधूत घाडगे, भूषण कोकाटे, नवनाथ ठाकूर, नवनाथ पवार, मिलिंद पाटील, विमा हात्रे, दिनेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आतातरी शासन आणि शाळेचे व्यवस्थाकप लक्ष देणार का हे पाहावे लागेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com