अभिजित घोरमारे
गोंदिया: मध्यप्रदेशच्या MP बालाघाटमध्ये Balaghat पोलिसांनी तब्बल ५ कोटींच्या 5 Crore बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यामध्ये तब्बल १० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत सर्व किंमतीच्या बनावट नोटा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. Rs 5 crore notes seized in Gondia
हे देखील पहा-
मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील Maharashtra गोंदिया Gondia जिल्ह्यात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींपैकी ६ आरोपी बालाघाटचे आहेत. तर इतर २ आरोपी गोंदियाचे रहिवासी असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
या नोटांचा वापर नक्षलवाद Naxalist पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर Kiranapur आणि गोंदिया Gondia या भागात या प्रकऱणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मध्यप्रदेशात आतापर्यंत झालेली बनावट नोटांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.