पुरग्रस्तांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात भाजप २९ ऑक्टोबरला करणार आंदोलन
पुरग्रस्तांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात भाजप २९ ऑक्टोबरला करणार आंदोलन विजय पाटील
महाराष्ट्र

पुरग्रस्तांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात भाजप २९ ऑक्टोबरला करणार आंदोलन

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: आघाडी सरकारकडून सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त व्यापारी नागरिक यांना अत्यंत तुटपुंजी मदत करण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या या तुटपुंज्या मदती विरोधात भाजपने 29 ऑक्टोबर रोजी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन पुकारले आहे. सांगली मध्ये पार पडलेल्या पूरग्रस्त यलगार संवाद मेळाव्यामध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. (BJP will stage agitation on October 29 against the meager assistance received by the flood victims)

हे देखील पहा -

जुलै महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. या महापुरामध्ये शेतकरी, नागरिक आणि व्यापारऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना सानुग्रह अनुदान सुद्धा देण्यात आला आहे. मात्र नुकसान झालेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी अशी मदत देण्यात येत आहे. सांगली शहरातल्या जवळपास अडीचशेहून अधिक व्यापाऱ्यांना पाचशे रुपये हजार रुपये अशा पद्धतीची नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्यामुळे सांगलीतल्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपाकडून सरकारच्या तुटपुंज्या मदती विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. नुकताच आघाडी सरकारला 250 व्यापाऱ्यांनी मदत परत पाठवण्याचा आंदोलन केले होतं. आता या मदतीच्या विरोधात भाजपाचा सांगलीमध्ये आज पूरग्रस्त व्यापारी, शेतकरी यांचा यलगार संवाद मेळावा पार पडला.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ ,आमदार सुरेश खाडे ,तसेच भाजपा पदाधिकारी आणि  पूरग्रस्त व्यापारी यांच्या उपस्थितीत पार  पडलेल्या मेळाव्यात अधिकची मदत देण्याचा मागणीसाठी आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी 29 ऑक्टोबर रोजी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT