आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं असून आजही काही मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. या प्रकणात आज घडलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी...
आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...
आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...Saam Tv News
Published On

मुंबई: नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने २ ऑक्टोबरला कार्डिलिया क्रूझवर छापा टाकला होता. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला याला अटक करण्यात आली होती. आज वीस दिवसांनंतर देखील आर्यनला जामीन मिळालेला नाही. या ड्रग्स केसप्रकरणात आता आणखी काहींची चौकशी होण्याची शक्यता आहे. आर्यन खान प्रकरणाची देशभरात चर्चा सुरु असून याबाबत राजकारणही होतयं. विरोधकांच म्हणणं आहे की, सरकार एनसीबीसारख्या संस्थांचा वापर करुन महाराष्ट्राला, मुंबईला आणि बॉलिवुडला बदनाम करण्यासाठी आणि दबावात ठेवण्यासाठी करत आहे, तर सरकारचं म्हणणं आहे की, या संस्था त्यांचं काम करत असून यात सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं असून आजही काही मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. या प्रकणात आज घडलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी... (Today's 'five' big news in Aryan Khan drugs case ...)

हे देखील पहा -

१) आर्यन खानचा जामीन नाकारला

आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी आर्यन खानला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तसेच, यासंदर्भातली सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी पुढची तारीख दिल्यामुळे आर्यनचा मुक्काम वाढला आहे.

आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...
आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

२) अटकेनंतर पहिल्यांदाच शाहरुख जेलमध्ये जाऊन आर्यनला भेटला

सकाळी ९.१५ च्या दरम्यान शाहरुख खानआर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. या दोघांमध्ये २० मिनिट चर्चा झाली. करोना काळात जेल बंद असल्याने नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. नातेवाईकांना आता कैद्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. तसेच दोघांच्या मध्ये काच होती आणि ते इंटरकॉमवर बोलत होते.

आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...
आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात (Video)

३) एनसीबीची एक टीम शाहरुखच्या तर दुसरी टीम अनन्या पांडेच्या घरी पोहोचली

शाहरुख खानच्या वांद्रे येथील 'मन्नत' बंगल्यावर NCB ची टीम पोहोचली. एनसीबीची एक टीम शाहरुखच्या बंगल्यावर पोहोचली, तर दुसऱ्या टीमने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहचत तिला समन्स दिले आहे. तिला आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...
NCB 'मन्नत' वर पोहोचली; अभिनेत्री अनन्या पांडेच्याही घराची तपासणी

४) जास्मिन वानखेडे यांची पत्रकार परिषद

जास्मिन वानखेडे यांचा आर्यन खान प्रकरणाशी थेट संबंध नसला तरी त्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या बहिण आहेत. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वातच कार्डिलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप करत यात त्यांच्या बहिण जास्मिन यादेखील सहभागी असल्याचा आरोप केला होता. यानंतर जास्मिन यांनी अमेय खोपकर आणि शर्मिला ठाकरे यांच्यासोबत संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत मलिकांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर प्रहार केला.

आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...
"तुम्हाला बांगड्या पाठवू का?" जास्मिन वानखेडेंचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर...

५) समीर वानखेडेंच्या परिवाराने बॉलिवूडमधून वसूली केल्याचा मलिकांचा आरोप

मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्या परिवारावर बॉलिवूडमधून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला. कोविड काळात मालदीव आणि दुबईत जाऊन बॉलीवुडमधील कलाकारांकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप मलिकांनी समीर वानखेडे परिवारावर केला आहे. चाकण येथील एका कंपनीच्या उद्घाटनावेळी माध्यमाशी बोलतांना त्यांनी हे आरोप केले.

आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी आजच्या 'पाच' मोठ्या बातम्या...
समीर वानखेडेंची बॉलिवूड अभिनेत्यांकडून मालदीवमध्ये वसूली; मलिकांचा गंभीर आरोप

एकुणच आर्यन खान प्रकरणामुळे राजकारणही मोठ्या प्रमाणात होत असून विरोधक विरुद्ध एनसीबी असा संघर्ष पहायला मिळतोय. या प्रकरणात अनन्या पांडेला अटक होणार का? आर्यनला जामीन कधी मिळणार? मलिकांनी केलेले आरोप आणि जास्मिन यांनी केलेले आरोप यांच्यात तथ्य आहे का? असा बऱ्यांच प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com