"तुम्हाला बांगड्या पाठवू का?" जास्मिन वानखेडेंचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर...
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ठराविक लोकांना लक्ष्य करत असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात त्यांनी समीर वानखेडे यांच्या बहिण जास्मिन वानखेडे यांना लेडी डॉन म्हणत त्यांच्यावरही अनेक आरोप केले होते. या आरोपांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आता पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली आहे. जास्मिन वानखेडे या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सदस्य असल्याने त्यासुद्धा या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या होत्या. मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सचिव शर्मिला ठाकरे यांनीही नवाब निशाणा साधला आहे. ("Shall we send you bangles?" Jasmine Wankhede's reply to Nawab Malik)
हे देखील पहा -
याबाबत अमेय खोपकर म्हणाले की, जास्मिन वानखेडे या आमच्यासोबत काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. नवाब मलिक यांनी खालच्या पातळीवर जाऊन जो आरोप केला आहे तो योग्य नाही. जास्मिन या वकील आहेत, खालच्या पातळीवर एका महिलेवर टीका करत आहे काही कळत का? मनसे चित्रपट सेनेचं विनाकारण नाव घेतलं. तुमचं राजकारण चुलीत गेलं, मनसे जास्मीन वानखेडे यांच्यामागे खंबीर उभी आहे. ज्या प्रकारचं काम पोलीस आणि एनसीबी करत आहे ते आपल्यासाठी करत आहे. ड्रग्सचा नायनाट झाला पाहिजे. क्रांती रेडकर या म्हणाल्या होत्या की, कोणी पुढे येत नाही. गरज लागली तर क्रांती यांच्या मागे मनसे उभी राहील. जास्मीन यांच्यावर केलेले आरोप आम्ही खपवून घेणार नाही. रात्रंदिवस त्या काम करतात महिलांसाठी मुलांसाठी त्यांच्याबाबत कोणतीही टीका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराच अमेय खोपकर यांनी दिला आहे.
आम्हाला त्यांचा अभिमान
याबाबत शालिनी ठाकरे म्हणाल्या की, गेल्या ४ वर्षात जास्मीन वानखेडे या मनसे सोबत काम करतात. वकील म्हणून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. गेल्या ४ वर्षात त्या कोण आहेत, खंडणी घेण्याचे आरोप कधीच केला नाही. सरकारच्या इतर पक्षात कोण कोण सेट वर जाऊन खंडणी वसूल करतो हे सगळ्यांना माहीत आहे.ते फक्त बहीण-भाऊ आहेत म्हणून आरोप करत आहात, सरकारमध्ये आहेत ना मग थोडी तरी लाज ठेवा, त्यांचं स्वतःचं काम आहे आणि मनसे त्यांच्या सोबत असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.
अमेय खोपकर पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे लोक खंडणी घ्यायला जातात, त्यांची यादी काढतो मग कारवाई करा. नवाब मलिक त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणार. मलिक यांनी आधी स्वतःच्या घरी वाकून बघा. आता आम्ही तुमच्या मागे लागणार असा इशारा खोपकर यांनी मलिक यांनी दिला आहे.
मी तुम्हाला बांगड्या पाठवू का?
जस्मीम वानखेडे म्हणाल्या की, मलिक जी तुम्ही ज्या पोझिशनला आहेत त्याबाबत तुम्हाला शोभत नाही. आम्ही काम करणारे लोक आहे. मी वकील आहे, तुम्हाला लाज नाही वाटत, मी तुम्हाला बांगड्या पाठवू का? कुर्ला परिसरात काही तरी करा, महिलांसाठी काही चांगली काम करा. तुम्ही कोणालाही डॉन बोलतात. मी काय करते.. काय अनधिकृत करते की तुम्ही मली डॉन बोलत आहात, असा सवालही जास्मिन यांनी उपस्थित केला आहे.
...म्हणजे तुम्ही "भाई" आहात का?
खोपकर म्हणाले की, तुम्ही जास्मीनला डॉन म्हणतात, तुम्हालाही नवाब भाई म्हणतात म्हणजे तुम्ही "भाई" आहात का? भाई म्हणजे डॉन. आम्ही काय मालदीवला जाऊ शकत नाही का? असा खोचक टोला त्यांनी मलिकांना लगावला.
योग्य वेळी योग्य पुरावे सादर करणार
जास्मीन म्हणाल्या की, आम्ही ऑस्ट्रेलिया बाबत बोललो का? माझी पर्सनल लाईफ आहे, मी काय करत होती, मी मित्रांना सांगणार काय करत होती, नवाब मलिक यांना का सांगू, ते काय जज आहेत का? पोस्को, साकिनाका प्रकरणात कोणी काय बोलत नाही. आधी पुरावे सादर करावा मग वायफळ आरोप करा, करायचं आरोप म्हणून काहीही करायचे नाही, मी पुराव्यांवर विश्वास ठेवते. योग्य वेळी योग्य पुरावे सादर करणार असं सुचक वक्तव्य जास्मीन वानखेडे यांनी केलं आहे.
Edited By - Akshay Baisane