Bjp  saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत भाजपची भूमिका काय ? भाजप खासदाराने स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आक्रमक होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा (mva government) सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. शिंदे गट आणि मविआच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टात एकमेकांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे गट (Eknath shinde) आणि शिवसेना यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरुच आहेत. मात्र, भाजपच्या गोटातून यावर ठामपणे प्रतिक्रिय येत नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये उभी फूट पडली आहे. परंतु, आमदारांच्या बंडखोरीच्या भूमिकेत आमचा कसलाही संबंध नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील राजकारणाच्या सध्याच्या घटनाक्रमावर भाजपची वेट अॅंड वॉचची भूमिका घेतली आहे, असं महाडीक यांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळं हे सरकार कोलमडेल अशी चिन्ह दिसत असताना राज्यातील विरोधी पक्ष भाजप मात्र याकडे 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. सध्या राज्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेकडे भाजप लक्ष ठेऊन आहे. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अद्याप राजकीय परिस्थितीवर भूमिका जाहीर केलेली नाहीये, असंहा महाडीक म्हणाले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT