- पराग ढाेबळे
देव काेणी पाहिला नाही परंतु देवाचा अवतार म्हणून आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj jayanti) यांच्याकडे पाहताे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या नसा-नसांत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याच काम सर्वांनी केले पाहिजे असे मत खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी व्यक्त केले. दरम्यान एका प्रश्नावर बाेलताना उदयनराजे भाेसले यांनी आगामी लाेकसभा निवडणुक (loksabha election 2024) सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) लढवण्याचे संकेत अप्रत्यक्ष माध्यमांशी बाेलताना दिले. (Maharashtra News)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चंद्रपूर येथे आयाेजिलेल्या एका कार्यक्रमास खासदार उदयनराजे भाेसले हे जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी ख-या अर्थाने लाेकशाहीची स्थापना केली. लोक कल्याणाचा विचार महाराजांचा होता. शिवरायांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पाेहचविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.
खासदार श्रीनिवास पाटील यांना आव्हान देणार का?
आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील (shrinivas patil) हे लढण्याची शक्यता आहे. त्यांना तुम्ही आव्हान देणार का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले लोकशाही आहे. सर्वांना निवडणुक लढवण्याचे अधिकार आहे. ते वडीलधारी व्यक्तिमत्व आहे. तसं आव्हान वगैरे म्हणणार नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रत्येकाची इच्छा असते, यात मी अपवाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) आणि त्यांचे सहकरी यांनी विकास पोहचवला आहे. महाराष्ट्रात आणि देशभरात विकास पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसरा विचार करणार नाही असे राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून (अजित पवार गट) यांच्याकडून लढणार का या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.