BJP MP RAMRAO WADKUTE FUNERAL saam tv
महाराष्ट्र

भाजप खासदार रामराव वडकुते यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्ते ढसाढसा रडले; अखेरचा निरोप देताना पत्नीला अश्रू अनावर

Emotional Scenes At Ramrao Wadkute Funeral: भाजपचे दिवंगत राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्यावर हिंगोलीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडून तोफांची सलामी देण्यात आली. अंतिम यात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.

Omkar Sonawane

राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्यावर आज हिंगोलीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. हिंगोली जिल्हा पोलीस दलातील जवानांनी तोफांची सलामी दिली होती. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान रामराव वडकुते यांच्या अंत्यविधीवेळी कुटुंबीयांना अश्रू दाटून आले होते, तर कार्यकर्त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला होता.

भाजपचे राज्यसभा दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने खासदार रामराव वडकुते यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं होतं. वडकुते यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्त्यांसह मराठवाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान काल परभणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते.

त्यानंतर आज हिंगोलीमध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार पार पडले. हिंगोली शहरातील प्रमुख महामार्गावरून निघालेल्या खासदार रामराव वडकुते यांच्या अंतिम यात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत रामराव वडकुते यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder Rules : एका वर्षात किती गॅस सिलिंडर मिळतात? 12 सिलिंडरचा नियम काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: नकली केसांवरून चेष्टा, आडनावावरून चिडवाचिडवी! कल्याणमध्ये दोन गटांत तुफान राडा

Kaun Banega Crorepati 18: मराठमोळ्या भूषण ठाकरेचं नशीब फळफळलं! २४ रुपये बँकेत असताना जिंकले १ कोटी, आईसाठी घेतला मोठा निर्णय

शरद पवार गट NDAला पाठिंबा देणार की नाही, डिलिमिटेशननंतर राजकीय समीकरणं बदलणार? खासदाराच्या विधानानं चर्चांना उधाण

Rapido Bike Taxi: परवाना नसताना रॅपिडोकडून पुणे शहरात सेवा, कंपनीविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT