LPG Cylinder Rules : एका वर्षात किती गॅस सिलिंडर मिळतात? 12 सिलिंडरचा नियम काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sakshi Sunil Jadhav

वर्षभरात १२ अनुदानित सिलिंडर

प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी LPG गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. घरगुती ग्राहकांसाठी एका वर्षात १४.२ किलोचे १२ अनुदानित सिलिंडर मिळण्याची मर्यादा असते.

12 LPG Gas Cylinder Rule | saam tv

१२ सिलिंडरचा नियम म्हणजे काय?

LPG च्या नियमाचा अर्थ एका वर्षातल्या १२ सिलिंडरपर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो. ही अनुदानित सिलिंडरची मर्यादा आहे.

12 LPG Gas Cylinder Rule

सिलिंडरचा नियम

प्रत्येक महिन्याला फक्त एकच सिलिंडर बुक करता येतो, असा नियम सरकारने २०१४ मध्येच रद्द केला होता.

12 Gas Cylinder Rule

१२ सिलिंडर संपल्यानंतर काय?

१२ अनुदानित सिलिंडरची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर पुढच्या सिलिंडरच्या किमतीवर अनुदान मिळण्याचा हक्क संपतो. जास्त रिफिलची उपलब्धता आणि किंमत तेल कंपन्यांच्या लागू नियमांनुसार तपासली पाहिजे.

LPG Subsidy Amount

उज्ज्वला योजनेचे ग्राहक

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात १४.२ किलोच्या प्रत्येक पात्र रिफिलवर ३०० रुपयांचं अनुदान, वर्षाला जास्तीत जास्त ९ रिफिलपर्यंत मंजूर करण्यात आले होते.

LPG Subsidy Amount

अनुदानाचे पैसे कुठे जमा होतात?

तुम्ही उज्ज्वला योजनेसाठी पात्र असाल तर ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Gas Cylinder Booking

आधार कार्ड

१९ सप्टेंबर २०२६ च्या केंद्र सरकारच्या माहितीनुसार, अनुदानासोबत नियमित दरात रिफिल बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार Authentication गरेजेचं किंवा अनिवार्य आहे.

Gas Cylinder Booking

आधार Authentication

तुम्ही इंडेन ग्राहक IndianOil ONE, भारत गॅस ग्राहक Hello BPCL आणि एचपी गॅस ग्राहक असाल तर HP PAY अॅपच्या मदतीने Authentication करू शकता. गॅस वितरकाकडेही ही सुविधा उपलब्ध आहे.

Gas Cylinder Booking

गॅस सिलिंडरचे अनुदान तपासा

ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीकडून किंवा संबंधित कंपनीच्या अधिकृत अॅपवरून रिफिल आणि अनुदानाची स्थिती तपासावी.

Gas Cylinder Booking

NEXT : थंडीत इडलीचं पीठ फुलत नाही? मग या 8 भन्नाट टिप्स वापरा, इडली होईल मऊ आणि स्पंजसारखी

8 Genius Tips to Make Soft, Spongy Idlis During Winter | saam tv
येथे क्लिक करा