Vikhe Patil-Tambe Saam TV
महाराष्ट्र

Vikhe Patil News: सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढेल असं नाही; राधाकृष्ण विखे पाटलांना असं का वाटतं?

RadhaKrishna Vikhe Patil on Satyajeet Tambe: सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा फायदा होईल, असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

RadhaKrishna Vikhe Patil : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरुन तांबे कुटुंबियांनी घेतलेली भूमिका अनपेक्षित होती. या सर्व घडामोडींवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी स्वागतच करेन. पण सत्यजित याच्या भाजपमध्ये येण्याची अहमदनगरमध्ये भाजपची ताकद वाढेल असं नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.

सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झाली आहे. काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही परिस्थिती आहे. लोकांना काँग्रेस पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सत्यजित तांबे यांची देखील अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. (Latest News Update)

सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्याने भाजपची नगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल असे नाही, कारण भाजप आधीच तिथे ताकदवान आहे. मात्र सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा फायदा होईल. चांगले लोक पक्षात यावे यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.

सत्यजित तांबे यांनी विश्वासघात केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. मात्र विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोलेंनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा. बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित यांच्या या निर्णयाला समर्थन आहे का? यातच नाना पटोले यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की विश्वासघात केला की नाही, असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं.

भाजपने जर सत्यजित यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही, असं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

Daily Horoscope: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; वाचा तुमचे राशीभविष्य

Pregnancy: गरोदर महिलांनी चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये, कारण...

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब का झाला?

Maharashtra Live News Update: पुराच्या पाण्यात चारचाकी वाहन वाहून गेलं

SCROLL FOR NEXT