पुणे : औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुण्याच्या नामांतराची मुद्दा पुढे आला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी पुण्याच्या नामांतराची मागणी केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीने आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्यानं नाव बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत मागणी केली आहे. त्यामुळे पुण्याच्या नामांतराचा मुद्दा आता राजकीय वळण घेणार असं दिसून येत आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं की, पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.
मात्र पुण्याचे नाव बदलण्याची काहीही गरज नसल्याचं हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या नामांतराची गरज नाही. जिजाऊंचं भव्य आणि वेगळं स्मारक उभारा आणि ते लाल महाल येथे उभारा. पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. (Tajya Batmya)
राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवमुळे पडले आहे, ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिवभक्त शिवछत्रपती यांनी सुद्धा ते बदलले नाही. त्यापेक्षा पुण्यश्वर महादेव त्या दर्ग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडने आमच्या बरोबर यावे. राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल, असं आनंद दवे यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.