Bhandara News
Bhandara NewsSaam Tv

Bhandara News: दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात, भंडाऱ्याचा मासळच्या तरुणाचा प्रताप

दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात, भंडाऱ्याचा मासळच्या तरुणाचा प्रताप
Published on

भंडारा : घरी पत्नी व मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात होता. परंतु, पहिली पत्नी थेट लग्नमंडपात धडकली. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची एकच तारांबळ उडाली. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील तरुणाचा हा पराक्रम मुंबईच्या कल्याण येथे उघडकीस आला असून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)

Bhandara News
Jalgaon News: आई गायीला पाणी पाजण्यासाठी गेली; तिकडून आल्‍यावर मुलीला पाहून आक्रोश

मासळ (ता. लाखांपूर) येथील खेमराज बाबुराव मुल (वय ४०) हा पेंटचा व्यवसाय करतो. मागील १५ वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून गावातीलच मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. काही दिवस पत्नीसोबत गोडीगुलाबीने राहिला. या दरम्‍यान त्यांना मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात बेबनाव सुरू झाला. पत्नीविरोधात घटस्फोटाची केस न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात (Court) असतानाच दुसऱ्या लग्नाची तयारी चालवली.

अन्‌ पत्‍नी धडकली लग्‍नमंडपात

पत्नीला हा प्रकार कळला असता लग्नाची तारीख माहीत करून घेत पतीचा डाव उधळण्यासाठी ती विवाहस्थळी मुलगा, भाऊ, बहिणीसह कल्याण (पूर्व) येथील दर्शन मॅरेज हॉलमध्ये धडकली. यातील वर-वधू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असताना पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने लग्नाचा डाव उधळला. दुसरे लग्न (Marriage) करणाऱ्या पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी खेमराज मुल याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कल्याणमधील (मुंबई) कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com