Sunil Kedar News: माजी मंत्री सुनील केदार यांना १ वर्षाची शिक्षा; काय आहे ६ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

Sunil Kedar News : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा न्यायालयानं एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Sunil Kedar News
Sunil Kedar NewsSAAM TV

Sunil Kedar News : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा न्यायालयानं एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या सहायक अभियंत्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे.

६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणतर्फे (MSEDCL) कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाबाची वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या.

Sunil Kedar News
Pune News: पुण्याचं नाव बदलण्याची अमोल मिटकरींची मागणी; आनंद दवेंचा जोरदार विरोध

वीज वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहायक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी (Farmer) त्यांच्या पीक नुकसानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले.

काय आहे प्रकरण?

महापारेषणच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी आणि इतर चौघांनी खुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली.

Sunil Kedar News
Nashik Road Accident : नाशिक-शिर्डी बस अपघातात अंबरनाथच्या सहा जणांनी गमावला जीव; मोरीवली गावावर शाेककळा

पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता. या प्रकरणात सावनेर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com