PM Narendra Modi And Sharad Pawar SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोदींशिवाय पर्याय नाही; तिसऱ्या आघाडीवरून भाजप नेत्याचा शरद पवारांवर निशाणा

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.

Nandkumar Joshi

सचिन बनसोडे, शिर्डी / अहमदनगर

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. दुसरी आणि तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. सगळा प्रयत्न अस्तित्व टिकवण्यासाठी आहे, असे विखे पाटील म्हणाले. विश्वाने गौरवलेले नेतृत्व देशाला लाभलेले आहेत. जनतेने निर्णय केला आहे. मोदींशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे.

देशात दुसरी आणि तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. सर्व प्रयत्न हे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. त्यांचा हेतू खरंच प्रामाणिक आहे का, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

शरद पवार यांच्यावर टीका

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वावर भाष्य केले. विश्वाने गौरवलेले नेतृत्व आज भारताला लाभले आहे. जनतेने निर्णय केलाय, मोदींशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कितीही आघाड्या बांधू द्या, काय अवस्था झालीय जनतेने बघितलंय. ज्यांना राज्याची वज्रमूठ बांधता आली नाही, ते देशात काय तिसरा पर्याय देणार, अशा शब्दांत विखेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

छगन भुजबळ यांची राऊतांवर टीका, विखेंचा चिमटा

सामनाच्या अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनीही संजय राऊतांना उत्तर दिलं. यावरून विखे पाटलांनी चिमटा काढला. वज्रमूठ एकमेकांवर उगारतील. वज्रमूठीला आता तडे गेले आहेत. वज्रमूठीचा अवतार आता संपुष्टात आला आहे, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

तुमच्या थापांना जनता बळी पडणार नाही- विखे

राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला. त्यांनी काय चित्र बदलायचं स्वप्न दाखवलं माहीत नाही. तुमच्या कोणत्याही थापांना राज्यातील जनता बळी पडणार नाही. प्रादेशिक वाद उभे करून लढाया लावण्याचे काम झाले. कुटुंबा-कुटुंबात लढाया कुणी सुरू केल्या? राज्यातील सहकार चळवळ कुणी संपुष्टात आणली? खाजगीकरणाला वाव कोण देतंय? जनतेला सगळे समजते, जनता अडाणी नाही, असे विखे - पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT