तबरेज शेख, प्रतिनिधी...
Chhagan Bhujbal On Sanjay Raut: गेल्या आठवड्यात राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. ज्याचे केंद्रबिंदू ठरले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र अखेर कार्यकर्ते आणि नेत्यांच्या विरोधानंतर शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावा लागला.
परंतु शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरुन आता महाविकास आघाडीमध्येच जुंपल्याचे समोर आले आहे. सामनामधून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सामनाच्या (Samana) अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले' असा आरोप केला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ...
शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना काय अडचण आहे? संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे ? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
तसेच यावेळी पुढे बोलताना "राऊत यांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. मतभेद निर्माण व्हावेत, असे वाटते का?" असेही छगन भुजबळ म्हणाले. "तुमचं जेवढ आयुष्य आहे तेवढं शरद पवार साहेबांचा राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार,सुप्रिया सुप्रिया सुळे,जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत," अशा शब्दात छगन भुजबळ यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. (Maharashtra Politics)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.