bjp mp sunil mendhe warns marketing officer on farmer issue near bhandara saam tv
महाराष्ट्र

Bhandara : शेतकऱ्यांचे पैसे अडवले तर याद राखा!; भाजप खासदार सुनील मेंढेंनी सरकारी अधिकाऱ्याला धरलं धारेवर

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

आमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. आम्हांला पैशांची आवश्यकता आहे. किती दिवस आम्ही थांबायचे असे गा-हाणे शेतकऱ्यांनी भाजप खासदार सुनील मेंढे (BJP MP Sunil Mendhe) यांच्याकडे मांडले. त्यानंतर खासदार मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी संपर्क साधत त्यांना झापलं. शेतकऱ्यांना त्रास दिला तर तुमची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही खासदार मेंढे यांनी अधिका-यास दिला. (Maharashtra News

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात खासदार सुनील मेंढे यांचा संपर्क दौरा सुरु आहे. आसगाव मधील शेतकऱ्यांनी खासदार मेंढे यांच्याकडे त्यांची समस्या मांडली. जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याची तक्रार शेतक-यांनी खासदार सुनील मेंढे यांच्याकडे केली.

त्यानंतर खासदार मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना फोन लावला. दाेघांचा संवाद सुरु असतानाच मेंढे जिल्हा पणन अधिकारी यांच्यावर संतापले. त्यांनी जिल्हा पणन अधिकारी यांस चांगलेच धारेवर धरले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धान खरेदी केंद्र आपल्या कामात अफरातफर करत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. ते अधिकार तुमच्याकडे आहे. मात्र खबरदार तुम्ही शेतकऱ्यांना त्रास दिला तर. तुमची गय केली जाणार नाही असा सज्जड दमच मेंढेंनी अधिका-यांना भरला.

दोन दिवसात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करा असा आदेशच खासदार मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिला. शेतकऱ्यांचे पैसे अडवायचे नाहीत जे काही करायचे आहे ते तुम्ही धान खरेदी केंद्रावर करा. शेतकऱ्यांना नाहक त्रास द्यायचा नाही असेही खासदार मेंढेंनी अधिकाऱ्याला खडसावले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT