BJP MP Prataprao Chikhalikar reaction on Cars vandalized by Maratha agitators in nanded Saam TV
महाराष्ट्र

Prataprao Chikhalikar: अचानक मराठा तरुणांनी घेरलं अन्... ताफ्यावरील दगडफेकीनंतर भाजप खासदाराची पहिली प्रतिक्रिया

Prataprao Chikhlikar News: गुरुवारी रात्री प्रतापराव चिखलीकर कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले असता, तेथील मराठा तरुणांनी त्यांच्या ताफ्यावर दगड-विटांचा मारा केला.

Satish Daud

BJP MP Prataprao Chikhlikar News

नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. गुरुवारी रात्री चिखलीकर कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले असता, तेथील मराठा तरुणांनी त्यांच्या ताफ्यावर दगड-विटांचा मारा केला. या दगडफेकीत चिखलीकर यांना कुठलीही इजा झाली नाही. मात्र, त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या घटनेवर प्रतापराव चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबुलगा गावात (Nanded News) माझा कोणताही राजकीय कार्यक्रम किंवा बैठक नव्हती. मित्र आजारी असल्याने मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. मात्र, गावात प्रवेश करताच अचानक मराठा तरुण आले.

मी गावात का आलो याचं कारण न विचारताच या तरुणांनी ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केली, असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे, पण असा उद्रेक योग्य नाही, अशी खंत देखील चिखलीकर यांनी बोलताना व्यक्त केली.

पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले, अनेक ठिकाणी मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं देखील मी समर्थन करतो. पण कुणी आजारी असल्यास त्यांची विचारपूस करण्यासाठी देखील गावात जायचं नाही का? कोणाच्या अंत्यविधीला जायचं नाही का? असा सवालही चिखलीकर यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाने सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमावर बिनधास्त बंदी घालावी, पण नातेवाईकांना भेटने अंत्यविधीला जाण्यास राजकीय नेत्यांना बंदी घालू नये. या गोष्टींचा मराठा तरुणांनी तसेच आंदोलकांनी विचार करावा, अशी विनंती देखील चिखलीकर यांनी केली. माझ्या ताफ्यातील वाहने फोडल्यानंतर माझ्या मनात मराठा समाजाबद्दल कुठलाही राग नाही, असं देखील चिखलीकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT