maha vikas aghadi and bjp  saam tv
महाराष्ट्र

'महाविकास आघाडी सरकार १५ लाखाला नोकऱ्या विकणारं होतं'; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

महाविकास आघाडी सरकार हे १५ लाखाला नोकऱ्या विकणारं होतं, असा आरोप देखील बोंडे यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Anil Bonde News : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र व राज्य सरकारवर शेगावच्या सभेमध्ये मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या नाहीत. लोकांना बेरोजगार केलं, असा आरोप राहुल गांधी केल्यानंतर त्याला राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच ' महाविकास आघाडी सरकार हे १५ लाखाला नोकऱ्या विकणारं होतं, असा आरोप देखील बोंडे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

अनिल बोंडे म्हणाले, 'अडीच वर्षाच्या मागच्या काळामध्ये एकाही डिपार्टमेंटची परीक्षा झाली नाही. ज्या ज्या डिपार्टमेंटच्या परीक्षा झाल्या त्या त्या परीक्षा त्यांना रद्द करावा लागल्या. कारण त्याच्यामध्ये पैसे खाण्याचे प्रकार उघडकीस आले आणि त्यांनाच रद्द करावे लागले'.

' अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं एका पोरालाही नोकरीची ऑर्डर अडीच वर्षाच्या काळात दिली नाही, आता देवेंद्र फडणवीस साठी एकनाथ शिंदे यांनी 75 हजार नोकऱ्यांकरता टीसीएस त्याचप्रमाणे नॅशनल लेव्हलच्या सरकारी एजन्सी नेमलेल्या ज्या पारदर्शकपणे परीक्षा घेतील म्हणजे जो गुणवत्ता असलेला विद्यार्थी राहील त्याला नोकऱ्या मिळेल', असे बोंडे पुढे म्हणाले.

'तर १५ -१५ लाखाला नोकरी विकणारं हे महाविकास आघाडीचे सरकार होतं, ते राहुल गांधींना माहित नाही हे दुर्दैव आहे, असा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT