Video : चंद्र, सूर्य, पृथ्वी आहे, तोपर्यंत...; राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची सारवासारव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांवरील विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला
devendra fadnavis
devendra fadnavis saam tv

सचिन जाधव

Devendra Fadnavis News : 'जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे, तोपर्यत आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज राहणार आहेत. यावर वाद होण्याच कारण नाही. त्यामुळे राज्यपाल यांचं पण तेच म्हणणं आहे. दुसरा वाद काही नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांवरील विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

devendra fadnavis
Supriya Sule : शिवरायांचा अपमान खपवून घेणार नाही; खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ७१ वा ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिप समारोप कार्यक्रम पुण्यात पार पडला.

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. त्यामुळे तुमची सर्व व्यवस्था या ठिकाणी झाली असेल, काही राहीलं असेल तर माफी असावी. देशभरातून खेळाडू आले, यामध्ये महिलांचं योगदान चांगलं आहे. जसे पुरुष अगोदर जास्त दिसायचे तसे आता महिला दिसत आहे'.

'खेळ मन आणि शरीराला मजबूत करते. त्यामुळे खेळाला महत्व आहे. जो खेळाडू असतो तो पराभव मानत नाही. तो खेळाडू हरल्यानंतरही परत उभा राहतो. लष्करामध्ये पण खेळाचं महत्व आहे. अनेक खेळाडूंना पोलीस खात्यात नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळं तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. देश सुरक्षित आहे', असे ते म्हणाले.

devendra fadnavis
समाजामध्ये जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे; राज्यपालांच्या वक्तव्यावरून शिवेंद्रराजे भडकले

देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. 'जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे, तोपर्यत आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज राहणार आहेत. यावर वाद होण्याच कारण नाही. त्यामुळे राज्यपाल यांचं पण तेच म्हणणं आहे. दुसरा वाद काही नाही, असे फडणवीसांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. तर सुधांशु त्रिवेदींच्या वक्तव्यार फडणवीस म्हणाले, 'सुधांशु त्रिवेदी यांचं म्हणणं मी नीट ऐकलं. त्रिवेदी हे असं कुठेही म्हटले नाहीत की महाराजांनी पाच वेळा माफी मागितली'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com