पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजपवर कठोर शब्दात टीका करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला कडक शब्दात इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला आहे. इतक्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला अशी विधानं शोभत नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एखादा व्यक्ती जर एक दोनदा चुका करत असेल तर ती चूक नसते. मात्र, तीच व्यक्ती जर वारंवार चूका करत असेल तर ती चूक नसते चॉईस असते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांचा चांगलंच सुनावलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सु्प्रिया सुळे म्हणाल्या, 'राज्यपालांविषयी आम्हाला बोलताना प्रोटोकॉल असतो, मात्र राज्यपालांना तो प्रोटो कॉल नसतो. त्यामुळेंते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलतान काहीही बेभानपणे बोलत असतात'
'एखादा व्यक्ती जर एक दोनदा चूकला असेल असेल तर ती चूक नसते. मात्र, तीच व्यक्ती जर वारंवार चूका करत असेल तर ती चूक नसते चॉईस असते. महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषाचा लाईट घेऊन अपमान करणे ही राज्यपालांचा चॉइस आहे. हे इतक्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणार नाही, असं म्हणत छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिला.
राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलतान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दबल आक्षेपार्ह विधान केले. 'तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत', असे वक्तव्य कोश्यारी यांनी केलं.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.