राज्यपालांच्या वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली; अजित पवार स्पष्टच बोलले

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
bhjagat singh koshyai and ajit pawar
bhjagat singh koshyai and ajit pawar saam tv
Published On

रश्मी पुराणिक

Ajit Pawar News : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

'राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

bhjagat singh koshyai and ajit pawar
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा; नाना पटोलेंची मागणी

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील राज्यातील राजकीय-सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांच्या विधानावर चांगलाच निशाणा साधला आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, 'महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील'.

bhjagat singh koshyai and ajit pawar
Pune News : राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक; कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्याला १ लाखांची रोख

'महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे', असे अजित पवार पुढे म्हणाले.

'राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना..." अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com