Gunratna Sadavarte Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Latest News : गुणरत्न सदावर्तेंच्या कार फोडणारे काल 'मातोश्री'वर होते, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

BJP MLA Nitesh Rane News : या हल्ल्याचा सखोल तपास व्हायला हवा, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली आहे.

प्रविण वाकचौरे

Nitesh Rane on Gunratna Sadavarte Car Attack :

मराठा आरक्षणाचा मुद्दा काल म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून पुन्हा पेटला आहे. त्यात मराठा आंदोलकांनी आज (२६ ऑक्टोबर) वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. सदावर्ते यांच्याकडून होत असलेल्या विरोधामुळे ही तोडफोड केल्याची माहिती आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तोडफोडीच्या घटनेदरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी खबळजनक आरोप केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारे काल 'मातोश्री'वर होते. हा नियोजित हल्ला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

या हल्ल्याचा सखोल तपास व्हायला हवा, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा कट मातोश्रीवर शिजतोस का? असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

गुणरत्न सदावर्ते हे रहात असलेल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरखाली आज सकाळी काही मराठा आंदोलक जमले होते. अचानक त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर काठ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांना त्यांनी लक्ष्य केलं. यावेळी मराठा आंदोलकांनी वाहनांवर हल्ला करत काचा फोडल्या. उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. एक जण अजूनही फरार आहे. (Latest Marathi News)

कोण आहेत आंदोलक?

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तिघेही छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळत आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी या तिघांना नावे आहेत. पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Brother : शहनाज गिलच्या भावाची ‘बिग बॉस १९’ मध्ये एन्ट्री, सिद्धार्थ शुक्लाचं नाव पुन्हा चर्चेत!

ITR Filling 2025: उत्पन्न एक रूपयाही नाही, तरीही आयटीआर भरावा का? आयकर विभागाचा नियम वाचा

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Gold Rate : पिवळ्या धातूची चमक कायम, नव्या उच्चांकावर पोहचलं, वाचा आजचे दर

Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT