BJP and Shinde Sena supporters clash during Zilla Parishad election campaigning in Atpadi, Sangli. Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या सभेवेळी शिंदेसेनेच्या प्रचाराची गाडी गेली, आमदार पडळकर समर्थकांनी फोडली; निवडणुकीत राडा

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

विजय पाटील, साम टीव्ही

राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची धुमाकूळ सुरू आहे. 12 जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकतो हे काही दिवसांनी स्पष्ट होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली. 7 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 9 तारखेला निकाल लागणार आहे. खरं म्हणजे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव. पण यंदा झालेल्या महापलिका निवडणुकीत अक्षरश: रक्ताचा सडा शिंपडला.

आधी तिकीट मिळवण्यावरून राडा, बी फॉर्मसाठी गाड्यांचा सिनेस्टाईल पाठलाग आणि विरोधी उमेदवाराच्या घरी जाऊन तोडफोड करणे हे या पुरोगामी महाराष्ट्राने बघितले. सोलापूरमध्ये तर मनसेच्या पदाधिकाऱ्याला जीव गमवावा लागला. दुसरीकडे खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या मंगेश काळोखे या स्थानिक नेत्याची चाकूने भोसकून हत्या झाली होती. या सर्व घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. यामुळेच की काय मतदानाचा टक्का देखील घसरल्याचे पाहायला मिळाले.

आता जिल्हा परिषदेतही अशाच घटनांची पुनरावृत्ती होताना बघायला मिळत आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार झाला आहे. आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे हा प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला.

आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहे. तर त्यांच्या विरोधात आयआरएस (IRS) अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत. या प्रचारादरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदेसेनाच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली, यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला. यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी मुलगा, आता पत्नीचे निधन; माजी मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर दु:खाचा डोंगर, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Jannat Zubair Attack: प्रसिद्ध अभिनेत्री आणि भावावर पनवेलमध्ये हल्ला? सोशल मीडियावरील ती पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: चिपळूणमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रदूषण कार्यालयात नागरिकांची धडक

प्रशासनात पुन्हा फेरबदल; बड्या IAS अधिकाऱ्याची अचानक बदली, कुठे होणार नियुक्ती?

Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT