BJP Gopichand Padalkar vs NCP Jayant patil Saam Tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : 'सत्ता गेल्याचे सुतक अजूनही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर'

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीकेचा भडीमार केला.

विजय पाटील

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand PadalKar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं सुतकआजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत असून शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची आहे. असा टोला पळकरांनी जयंत पाटलांना हाणला आहे. (Gopichand Padalkar News)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत होते. यावेळी पडळकर म्हणाले की, 'जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायची रचना केली होती'.

'माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. पोलिसांना सांगितले होते की, याला यात अडकावा, पण आम्ही घाबरलो नाही. रोज लढत राहिलो. पण 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर सेना आमदार सुरतला गेलेली बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा उतरला' (Gopichand Padalkar Latest News

'आजही जयंत पाटलांचा चेहरा बघा आजच्या तारखेपर्यंत त्यांचे सुतक गेले नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे'. असा टोला पडळकरांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. 'जयंत पाटील सत्ता असेल तर काम करू शकता. सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाली आहे'.अशी टीकाही आमदार पडळकर यांनी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT