मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतून (Shivsena) नेते तसेच पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचं सत्र सुरूच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू केली असून पक्षाविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात कडक पाऊलं उचलली आहे. आता विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. (Vijay Shivtare Latest News)
शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सामना या मुखपत्रातून देण्यात आली आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाच्या विरोधात जाऊन काम केल्यानंतर तसेच पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं आहे. इतकंच नाही तर शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करत होते. (Vijay Shivtare Todays News)
विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, विजय शिवतारे यांच्या हकालपट्टीमुळे आता पुरंदर तालुक्यातही शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच पुरंदर तालुक्याचा आढावा घेणार असून शिवतारे यांचं पुनर्वसन केलं जाणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.