pankaja munde News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बीआरएस पक्षाने पंकजा मुंडेंना दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'खडे टाकून...'

'बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.

संजय तुमराम

Chandrapur News: बीआरएस पक्षाने राज्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. याचदरम्यान, बीआरएस पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या ऑफरवर भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

'पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीआरएस पक्षात आल्या तर, आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करू. त्याचबरोबर बीडपासून हैद्राबादपर्यंत रेड कार्पेट अंथरून पंकजा मुंडे यांचं स्वागत करू ,अशी थेट ऑफर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाचे महाराष्ट्राचे समन्वयक शिवराज बांगर यांनी दिली आहे.

बीआरएस पक्षाच्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत आहे. मात्र, महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये देखील बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, असे मुनगंटीवार हे पुढे म्हणाले.

'तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या व त्यांचे राजीनामा दिलेले 3 मंत्री यांच्या बाबतीत घडलेली राजकीय घटना पुढ्यात आहे. हैदराबाद महापालिकेत देखील भाजप तीन वरून 50 पर्यंत मजल मारू शकला आहे. राष्ट्रभक्त- देशभक्त मतदार तूष्टीकरणाची नीती चालू देणार नाही, असेही ते म्हणाले.

'बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे. पंकजा मुंडे हे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला

मुनंटीवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या 10 हून अधिक जण स्वतःला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. दहाच काय राज्यात शंभर मुख्यमंत्री असावेत. स्वप्न पाहण्याला घटनेत कुठलीही मनाई नाही. मात्र या सर्व भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनात काय आहे हे बॅनरद्वारे सांगावे. यासोबतच या सर्वांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण करावे'. मुनंगटीवार यांच्या टीकेनंतर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

SCROLL FOR NEXT