BJP leader Vaishali Suryawanshi from Jalgaon receives ₹30 lakh extortion threat over alleged fake audio clip; saamtv
महाराष्ट्र

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

BJP Leader Vaishali Suryawanshi: भाजपच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांना मागील काही दिवसांपासून अमन नावाचा व्यक्ती फोन करून धमक्या देत होता. निवडणूक आयोगात तक्रार करून वैशाली सूर्यवंशींकडून ३० लाखांची खंडणी मागण्यात आली होती.

Bharat Jadhav

  • वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

  • मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवरून धमक्या येत होत्या.

  • वैशाली सूर्ववंशी यांनी तुमच्या गाडीमध्ये ड्रग्स ठेऊन अडचणीत आणण्याची धमकीही देण्यात आली होती.

पाचोरा येथील भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आलाय. अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांच्याकडे ३० लाखांची खंडणी मागितली. तुम्ही निवडणुकीत पैसे वाटले, तुमच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करू असं सांगत भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशींकडून ३० लाखांची खंडणी मागितली.

इतकेच नाहीतर सोशल मीडियावर बदनामीसह ड्रग्ज प्रकरणात ओढू, अशी धमकी सुद्धा या अज्ञाताने दिली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांना मागील काही दिवसांपासून अमन नावाच्या एका भामट्याने फोन करून धमक्या दिल्या होत्या.

सूर्यवंशी यांच्याकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमन नावाचा व्यक्ती वैशाली सूर्यवंशी यांना मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून धमक्या देत होता. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याची बनावट संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर टाकू. निवडणूक आयोग, CBI, ED व इन्कम टॅक्सकडे तक्रार करू अशीही धमकी हा अज्ञात व्यक्तीनं देत होता.

वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून पाचोरा-भडगाव मतदारसंघातून निवडणूक निवडणूक लढवली होती. नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील चार महिन्यापासून वैशाली सूर्यवंशी यांना अचानक धमकीचे फोन सुरू झाले. अमन नावाच्या व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून धमक्या देत होता. धमक्या येण्याचे प्रमाण वाढल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी थेट पोलीस स्टेशनात तक्रार देत गुन्हा नोंदवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

SCROLL FOR NEXT