तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Three Fishermen Arrested for physical assault: गुजरातच्या उना येथे ३ मच्छीमारांनी विधवा महिलेसोबत सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं.
Gujarat Shock 50-Year-Old Widow physical assaulted Twice in 24 Hours
Gujarat Shock 50-Year-Old Widow physical assaulted Twice in 24 Hours Saam Tv News
Published On
Summary
  • गुजरातमधून धक्कादायक घटना समोर.

  • विधवा महिलेशी सामूहिक बलात्कार.

  • पोलिसांनी ३ मच्छीमारांना घेतलं ताब्यात.

गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना येथून सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात २४ तासांत ३ पुरूषांनी ५० वर्षीय महिलेवर दोनदा बलात्कार केला. महिलेला दवाखन्यात नेण्यात आले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी बुधवारी तीन संशयित मच्छिमारांना अटक केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी उना येथील सरकारी रूग्णालयात एका विधवेला दाखल करण्यात आले. महिलेची तपासणी केल्यानंतर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे कुटुंबियांनी महिलेला दवाखान्यात नेलं. तेव्हा महिलेनं डॉक्टरांना बलात्काराबद्दल माहिती दिली.

Gujarat Shock 50-Year-Old Widow physical assaulted Twice in 24 Hours
'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या'; पोलिसांकडून शेतकऱ्यांना धमकी, बीडमध्ये चाललंय काय?

विधवा पीडितेनं नवबंदर मरीन पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेनं म्हटलं की, एक आठवड्यापूर्वी महिला मांडवी चेकपोस्टवरून गावी जात होती. यावेळी दुचाकीवरून तीन पुरूष आले. महिलेला गावात सोडण्याची ऑफर दिली. महिला त्यांच्यासोबत गेली.

तिघांनी महिलेला निर्जनस्थळी नेलं. तसेच तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. त्यानंतर तिघांनीही विधवा महिलेला एका आरोपीच्या घरी नेले. तिथेही महिलेवर बलात्कार करण्यात आला. यानंतर तिघांनी महिलेला घरी जाण्याची परवानगी दिली. तसेच लैंगिक अत्याचाराबद्दल कुणालाही सांगितले तर, गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी ३ मच्छीमारांना ताब्यात घेतलं आहे.

Gujarat Shock 50-Year-Old Widow physical assaulted Twice in 24 Hours
'बदला घेतल्याशिवाय राहणार नाही'; रिलस्टार भैय्या गायकवाडचा VIDEO व्हायरल, मारहाण करणाऱ्यांना थेट धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com