Maharashtra Politics
Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादीची औरंगजेबाचा महाल दुरुस्त करण्याची मागणी; भाजपच्या बड्या नेत्याची आगपाखड, म्हणाले...

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad News : औरंगजेबाचा महाल दुरुस्त करून रंगरंगोटी करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीनंतर महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. औरंगजेबाचा महाल दुरुस्त करण्याच्या मागणीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

औरंगजेबाचा महाल दुरुस्त करून रंगरंगोटी करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक सुंता झालीये, असा हल्लाबोल भाजप (BJP) प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी केला आहे. औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस वतीने औरंगजेबाचा महाल दुरुस्त करून संवर्धन करावे, अशी मागणी केली होती, त्यावर केणेकर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते वैचारिक सुंता झाल्यासारखे वागत आहे, अशी टीका केणेकर यांनी केली आहे

औरंगजेबाचे छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये सोळाशे पन्नास मध्ये वास्तव्य होते. त्याने त्या काळात एक महल बांधला. त्याला जनाना महल म्हणतात. त्या जनाना महलामध्ये औरंगजेब येथे वास्तव्यास होता. त्या महलाचे सुशोभीकरण करून रंगरंगोटी करावी , अशा प्रकारचे पत्र एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

दरम्यान, प्रत्यक्षामध्ये औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर ची मागणी अनेक वर्षापासून चालू होती. परंतु ती मागणी शिंदे फडणवीस सरकारने पूर्ण केली. या ऐतिहासिक शहराला आता छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये असणारा जनाना महल याचे सुशोभीकरण करावे असे वैचारिक दिवाळखोरी व सुंता झाल्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वागत आहेत , असा घणाघाती आरोप भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी केला.

केणेकर यांनी राज्य सरकारला देखील विनंती केली की , अशा कुठल्याही प्रकारच्या शासकीय निधी हा यावर खर्च करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केणेकर यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Antibiotics Awareness : गरज नसताना औषध घेतल्याने ओढावेल मृत्यू; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा सविस्तर

Mumbai News: मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग; तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार, मुंबईत काय घडलं?

Breakfast Recipe: सोप्या पद्धतीचे इंडियन नुडल्स; चिमुकले होतील खुश

Mankhurd Shawrma News | शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू, दोघांना अटक

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने

SCROLL FOR NEXT